नवी मुंबईत भाजपाला दणका; निवडणुकीच्या तोंडावर ३ नगरसेवक गेलेत शिवसेनेत

Shivsena & BJP

नवी मुंबई : करोनामुळे (Corona) लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्या गडाला सुरुंग लागला. नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते हे ३ नगरसेवक शिवसेनेत गेलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या तीनही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उल्लेखनीय म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांचे एकछत्री वर्चस्व आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात आले होते. नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकही भाजपामध्ये आले होते.

मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय आणि सत्तेची गणिते बदलली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता काबीज केली.

या बदललेल्या राजकीय स्थितीमुळे नवी मुंबईतही राजकारण बदलते आहे. भाजपाचे ३ नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. गणेश नाईक यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER