नामकरणावर भाजपला बोलण्याचा आधिकार नाही- आदित्य ठाकरे

Devendra-Fadnavis-Aditya-Thackeray

मुंबई :- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करून या शहराला संभाजीनगर (Sambhajinagar) हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेली पाच वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील (Mahavaikas Aghadi) मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेनेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं ‘संभाजीनगर’ असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

दरम्यान, या सर्व वादावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील विकासकामांसह औरंगाबादमधील स्थितीवरदेखील भाष्य केलं आहे. ‘मी औरंगाबादला जाणार आहे. तेथील विकासकामांचा आढावा घेणार आहे. तर, भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही. पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केलं नाही.’ असा घणाघात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : थोरातांनी बाबर खानदानावरची काँग्रेसची निष्ठा सिद्ध केली; भातखळकरांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER