‘भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही…, उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी ची प्रतिक्रिया…

jayant patil-CM uddhav Thackeray

वर्धा :  भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीची राज्यात विशेष चर्चा झाली. या भेटीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सध्या राज्य दौ-यावर आहेत. पाटील वर्ध्यात असताना माध्यमांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता पाटील यांनी भाजपवर चांगलेच टिकास्त्र डागले आहे.

भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात कधीतरी शिवसेना (Shivsena) पुन्हा आपल्यासोबत येईल, अशी आशा भाजपच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

तसेच, पाटील म्हणाले, भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करतं. भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघाच्या कामाचे कारण पुढे करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. या भेटीतून वेगळे अर्थ काढून चर्चा घडवून आणायची आणि त्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय वातावरणनिर्मितीचा फायदा उठवायचा, हा भाजपचा डाव असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER