मोदींमुळेच भाजपाला सात वर्षांपासून मिळते आहे यश; संजय राऊतांनी केले जाहीर कौतुक

Sanjay Raut & PM Modi

नाशिक : नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत असे मी मानतो. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळाले आहे हे नाकारता येणार नाही, असे शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असे वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणे थाबंत नाही. ते शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असते.

मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात, असे संजय राऊत म्हणालेत.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपाकडून बैठका सुरू असल्यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरु केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अधिक समन्वयाने काम करण्यासंबंधी एकत्रित बैठका सुरू केल्या आहेत. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष आहे, त्यांनी अशा बैठका घेणे अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button