मेट्रो लेन – ३ ची आखणी भाजपाने निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केली होती; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aditya Thackeray

मुंबई : सप्टेंबर २०१९ या निर्धारित वेळेत मेट्रो लेन – ३ (Metro Lane-3) चे काम पूर्ण होणे शक्य नव्हते हे सर्वांना माहीत होते. आरेतील झाडे तोडण्यावरची बंदी ऑक्टोबर २०१९ ला हटवण्यात आली. एक वर्षाचे काम एक महिन्यात होऊ शकत नाही, असे पर्यावरण व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले.

कारशेड कांजूरमार्ग येथे हलवून ती जागा वनविभागाला देण्यात आली. यामुळे मिठी नदीचा प्रवाह कायम रहाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपाने या प्रकल्पाची आखणी २०१९ ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केली, अशी टीका करून ते म्हणाले की प्रकल्प असा प्रकारे होत नसतात.

ते पुढे म्हणाले की, २०१५ ला मदान टेक्निकल कमिटीने कांजुरमार्ग येथील डेपोमध्ये लाईन्स ३ आणि ६ एकत्र करण्याची शिफारस केली होती. इथे येथे राज्य सरकारच्या मालकीची आणि पूर्व एक्स्प्रेस हायवेशेजारील १०२ एकर जमीन निःशुल्क उपलब्ध आहे. तत्कालीन सरकार त्याबद्दल काहीही बोलणार नाही.

एमएमआरडीए २०१८ पासून कांजूरमार्ग भूखंड मागत आहे. पण कार शेडसाठी जागा न देता मेट्रो लाईन ६ तयार करण्यात आली! बहुधा तत्कालीन सरकारला लाइन ६ साठी जागा देण्याची त्यांची इच्छा नव्हती कारण त्यांना कदाचित लाईन ३ कारशेड स्थलांतरित करावा लागला असता.

आरे येथील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना आदित्य म्हणालेत – आम्ही शहरात ८०० एकर जागेत संरक्षित जंगल निर्माण केले आहे; जगात कुठेही असे झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER