कोरोनाचं संकट दूर होताच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल – शशिकला जोल्ले

Shashikala Jolle

शिरोळ : गेल्या काही महिन्यांपासून भाजपाने इतर राज्यांतील कॉंग्रेसची सरकारे अस्थिर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेस (Congress) सरकार अस्थिर करून भाजपानं(BJP) सत्ता काबीज केली. त्यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस सरकारवर टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) ऑपरेशन लोटस(Operation Lotus) सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाचे(Coronavirus) संकट दूर होताच भाजपाचं सरकार स्थापन होईल, असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या संपूर्ण देशात कोरोनाचं संकट उभं आहे. हे संकट दूर होताच राज्यात भाजपाचं सरकार येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचंच सरकार हवं, असं त्यांनी सांगितलं. शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

तसेच मागील दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर स्थिती लक्षात घेतली असता दोन्ही राज्यांतील सरकारमध्ये पाहिजे तसा समन्वय नव्हता; मात्र आता सध्या दोन्ही राज्यांमध्ये चांगला समन्वय आहे. गेल्या वर्षी महापुराचा फटका दोन्ही राज्यांतील जनतेला बसला होता. तो अनुभव लक्षात घेता दोन्ही राज्यांतील सरकारांमध्ये समन्वय ठेवला आहे. त्यामुळे संभाव्य धोका नसल्याचा विश्वास मंत्री शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER