पाकिस्तानमध्येही भाजपाचे सरकार असणार! … कंगनाचे भन्नाट ट्विट व्हायरल

Kangana Ranaut

मुंबई : भारत पाकिस्तानला कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccination) ४.५ कोटी डोस देणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारत हा लसींचा पुरवठा करणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितले, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

यावरून अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) – ‘म्हणजे मोदीजी म्हणत आहेत की तो (पाकिस्तान) देखील भारताचाच वेगळा झालेला भाग आहे. तिथे देखील लवकरच भाजपाचे सरकार असणार… दहशतवादी माझे नाहीत पण तेथील लोक तर माझेच आहेत…हा हा हा.. जबरदस्त!

ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत भारताकडून पाकिस्तानला लसीचे ४.५ कोटी डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत देण्यात येतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला ‘सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये निर्मित लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER