आता ‘अब की बार, बस कर यार ‘चा नारा द्यावा लागेल : अशोक चव्हाण

Akot-Ashok Chavan

अकोट(अकोला) :- निवडणुकांपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही.त्यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे . देशात महागाई , बेरोजगारीसारखे मुद्दे निर्माण झाले आहे. यासर्वबाबींना शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यानंतर आपलेच सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे . सोबतच त्यांनी आगामी निवडणूकीत ‘अब की बार, बस कर यार !’ असा नारा द्यावा लागेल असेही म्हणाले .

अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान स्थानिक खरेदी विक्री मैदानात सभा पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते. देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे.

मोदी सरकारने जीएसटीचा कायदा शेतकऱ्यांवरही लादला . तो त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे . त्यामुळे हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे . कर्जमाफी पेट्रोल-डिझेल दरवाढ नोकरीच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी अद्यापही तशाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतील. हेच या सरकारचे धोरण असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे .