गुप्तेश्वर पांडे इच्छुक असलेल्या मतदारसंघात भाजपाने दिले निवृत्त कॉन्स्टेबलला तिकीट

परशुराम चतुर्वेदी -BJP

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election) आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जदयूमध्ये प्रवेश करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली. लोकांना असे वाटत होते की भाजपा त्यांना तिकीट देईल. पण या मतदारसंघात भाजपाने निवृत्त पोलीस हवालदार परशुराम चतुर्वेदी (Parashuram Chaturvedi) याना तिकीट दिले आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात परशुराम चतुर्वेदी म्हणले, “गुप्तेश्वर पांडे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांच्या आदरपूर्वक पाया पडतो. माझ्या मनातत्यांच्याबद्दल आपुलकी आहे.

बिहार पोलिसात असताना चतुर्वेदी यांनी सीआयडीसह अनेक विभागात काम केले आहे. मी काम केलेल्या प्रत्येक ठिकाणी माझा आदर होता. कामाच्या ठिकाणी मी खूप मेहनती व प्रामाणिक होतो. या अनुभवांमुळे मला राजकारणात मदत मिळाली, असे चतुर्वेदी म्हणाले.

गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने तिथे एका बिहारच्या निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी दिली आहे. बक्सरमधील भाजपाचे उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना मागे टाकत ही उमेदवारी मिळवली आहे अशी चर्चा सुरू आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक जवळ आल्यानंतर अचानक स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जदयूकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती.

पांडे म्हणाले – माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे त्रस्त झालो आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की, मी निवडणूक लढवेल. पण यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. हताश आणि नाराज होण्यासारखे काहीही नाही. संयम ठेवा. माझे जीवन संघर्षातच गेले आहे. आयुष्यभर जनतेची सेवा करत राहीन. संयम ठेवावा व मला फोन करू नये. माझे जीवन बिहारच्या जनतेला समर्पित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER