भाजपात प्रवेश करताच बाळासाहेब सानप यांना मोठी जबाबदारी ; चंद्रकांत पाटलांकडून नियुक्तीचे पत्र

Balasaheb Sanap & Chandrakant Patil

मुंबई :- माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. सानप यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सानप यांना नियुक्तिपत्र दिलं आहे. सानप यांनी गेल्या महिन्यात २१ डिसेंबर रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने आपली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करताना मला खूप आनंद होत आहे. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे. आपल्या आगामी कार्यास माझ्या शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील सानप यांना पाठवलेल्या नियुक्तिपत्रात म्हणाले आहेत. दरम्यान सानप यांच्या प्रवेशाने आगामी नाशिक महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे.

ही बातमी पण वाचा : लोकप्रतिनिधींना गरज नाही, सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्या, चंद्रकांत पाटलांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER