भाजपचे माजी आमदाराने मानले अजित पवारांचे आभार

Ajit Pawar

नागपूर :- रामटेक तिर्थक्षेत्राच्या (Ramtek) विकासासाठी निधी मिळाल्याने भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानलेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय. फडणवीस सरकारच्या काळात सात कोटी रुपये निधी देण्यात आला होता, पण नंतर निधी मिळाला नाही.

रामटेक तिर्थक्षेत्रातील विकासकामं थांबली होती. रामटेकचे तत्कालीन आमदारमल्लीकार्जुन रेड्डी यांनी तेव्हा पत्रव्यवहार केला होता. आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जैसवाल यांनीही निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला. आता सरकारने 14 कोटी रुपये मंजुर केले.

ही बातमी पण वाचा : आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही! : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER