मुंबई महापालिकेच्या ‘त्या’ वादग्रस्त कराराविरोधात भाजपकडून हायकोर्टात याचिका दाखल

BMC -BJP

मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC,) खासगी सुरक्षा कंपनीचे बाऊन्सर नियुक्त करण्याचा वाद आता न्यायालयात गेला आहे. वादग्रस्त ‘बाऊन्सर’ (‘Bouncer’)करारावरून भाजपने (BJP) नागरी स्थायी समिती सभापती, शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्याविरोधात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी खासगी सुरक्षा एजन्सीकडून ‘बाउन्सर’ घेण्याचा 32 कोटींचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

त्यांच्या जनहित याचिकेत भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि विनोद मिश्रा यांनी मुंबई महानगरपालिका, स्थायी समिती सभापती आणि कंत्राटदारांमधील आर्थिकसंबंध स्पष्ट न झाल्याने आम्हाला मुंबई हाय कोर्टात जाण्यास भाग पडले असा, आरोप केला आहे.

न्यायालयाने अलीकडेच सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावी, असे निर्देश दिलेले असल्याने त्यांनी हायकोर्टाकडे धाव घेतली असल्याचे नार्वेकर म्हणाले, स्थायी समिती सभापतींनी २० ऑक्टोबरला आमच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून २९ ऑक्टोबरला या प्रस्तावाला मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष आणि कंत्राटदार ईगल सिक्युरिटीज यांच्यात झालेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोप नार्वेकर यांनी केला आहे.

हा प्रस्ताव करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. आम्ही याविरोधात मुंबई हायकोर्टाकडे याचिका दाखल केली आहे. आम्हाला यावर स्थगिती मिळेल आणि वर्क ऑर्डर देण्यात येणार नाही याची खात्री करुन घेऊ. आम्ही संबंधित अधिकारी व कंपन्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि लोकायुक्त यांच्याकडेही तक्रार दाखल करीत आहोत, असे मिश्रा म्हणाले. ते म्हणाले, बीएमसीला अंदाजे किंमतींपेक्षा जास्त बोली लावल्यामुळे सुमारे आठ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

ही बातमी पण वाचा : जळगाव येथे भाजपाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; एकाला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER