दारूच्या दुकानाबाबत आस्था दाखवता मग प्रार्थना स्थळाबद्दल का नाही : फडणवीस

BJP Fadnavis

कोल्हापूर : केंद्र सरकारने (Center Govt) आदेश दिल्यानंतर एक महिन्यापासून देशभरातील सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळे खुली झाली. महाराष्ट्रात मात्र प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत निर्बंध आहेत. दारूची दुकाने सुरू करण्यासाठी जितकी आस्था दाखवली त्याच्या निम्मी आस्था प्रार्थनास्थळ सुरु करण्यासाठी सरकार का दाखवू शकत नाही? कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगसह नियमात राहून ज्यांची श्रद्धा आहे ते प्रार्थनास्थळ येथे जाऊन मनःशांती घेतली, यासाठीच भाजपने मंदिरे खुली करावित म्हणून घंटानाद आंदोलन (Ghantanad Andolan) पुकारले आहे.

ही बातमी पण वाचा:- सांगलीत सर्वाधिक कोरोना मृत्यूदर : देवेंद्र फडणवीस

दरम्यान कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करत प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी केली. याबाबत प्रतिक्रिया देताना कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महाराष्ट्र वगळता देशभरात प्रार्थनास्थळे सुरू आहेत. प्रार्थनास्थळ यांच्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला, असे एकही उदाहरण दिसत नाही. सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे बंधन घालून प्रार्थनास्थळे खुली करता येऊ शकतात. गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग होणार आहे. इतके भान महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER