भाजपचा पुन्हा पंकजा, खडसे, मेहतांना धक्का?

BJP executive may be Pankaja, Khadse, Mehta again

मुंबई :- भाजपची कार्यकारिणी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष पदानंतर संघटनेत सरचिटणीस (महामंत्री) पद प्रतिष्ठेचं मानलं जात. आता या पदावर कोणाची वर्णी लागते त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत नाराज झालेल्या नेत्यांना किमान ही पदं तरी दिली जातात का याकडेही संबंधित नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे.

सरचिटणीस पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, सुजितसिंग ठाकूर, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नावावर फुली मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर राज्य कार्यकारिणीतही या दिग्गजांचा विचार झाला नाही, तर भाजपमधील अंतर्गत वाद आणखी चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारू शकत नाही.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांची केंद्रीय पक्ष संघटनेत वर्णी लागण्याचे संकेत आहेत. विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीतही डच्चू देण्यात आला होता. शिवाय विधानपरिषद निवडणुकीतही त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. मात्र तावडे यांनी अन्य नेत्यांप्रमाणे त्याबाबत ना नाराजी व्यक्त केली ना पक्षविरोधी प्रतिक्रिया दिली. त्यामुळेच कदाचित त्याचंच बक्षीस म्हणून तावडेंना केंद्रीय पक्ष संघटनेत जागा मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER