भाजपाने काढले बाळासाहेबांचे कार्टून, उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

मुंबई :- भाजपाने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका करणारे व्यंगचित्र भाजपाने पोस्ट केले आहे. भाजपाच्या महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे चित्र ट्विट करण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेची खिल्ली उडवण्यात आली आहे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे आकाशात भेटले आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे वीर सावकर यांना उद्देशून म्हणतात, “तात्याराव काय म्हणू आता मी! मला वाटले होते पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली ” आता या व्यंगचित्रामुळेच चांगलाच वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

भाजपा गेल्या तीन महिन्यात आक्रमकपणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करते आहे. त्यातही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर वारंवार निशाणा साधला जातो आहे. आता या व्यंगचित्रातून बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांचा संदर्भ देऊन भाजपाने शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले आहे. आता या व्यंगचित्राचे काही उत्तर शिवसेनेकडून दिले जाणार का ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर रहावे लागले.