आदित्य ठाकरे दिवसरात्र काम करत असल्याचे भाजपवाल्याना दिसत नाही, शिवसेनेचे प्रत्युत्तर

Aaditya Thackeray - Anand Dubey

मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावावरुन भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंना उपनगरात शोधून दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा, अशी टीका भातखळकर यांनी केली होती. त्यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे जनतेसाठी दिवसरात्र काम करत आहेत हे भाजपवाल्यांना ते दिसत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dubey) यांनी प्रत्युत्तर दिले असून, भाजपचे संघटन कमकुवत झाल्याचा चिमटा त्यांनी यावेळी लगावला.

भाजपचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर म्हणतात की, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना दाखवा आणि मोफत लस टोचून घ्या. कालच आदित्य ठाकरे मलाड येथे कोविड सेंटरची पाहणी करण्याकरिता आले होते, हे भातखळकरांच्या नजरेत आले नाही. म्हणजे हे तर भाजप संघटन कुमकुवत झाल्याचे लक्षण आहे. आदित्य ठाकरे जनतेसाठी रात्रंदिवस एक करत आहेत. कोव्हिड सेंटर/हॉस्पिटलच्या माध्यमातून तसेच ऑक्सिजनच्या माध्यमातून असो अथवा व्हेंटिलेटर पुरवणे यांसारखी कामे ते सतत करत असतात, असे आनंद दुबे म्हणाले.

भाजप आमदारांना हे सर्व दिसत नाही. फक्त आणि फक्त त्यांना राजकारण करायचे आहे. आपल्याला कसे राजकारण करता येईल, आपण प्रसारमाध्यमांमध्ये कसे झळकत राहू, शिवसेना व महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बदनामी कशी करता येईल, हेच यांचे काम आहे. आपल्याला राजकारणाची हौस असली, तरी आम्हांला राजकारण करायचे नाही. आदित्य ठाकरे जिकडे गरज आहे, तेथे जबाबदारीने आपली कामगिरी पार पाडत आहेत. लोकांची मदत करत आहेत. तुम्ही फक्त राजकारण करत राहा. जनता आपल्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असे आनंद दुबे यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button