भाजपचे जिल्हाध्यक्ष जाणार शेतकऱ्याच्या बांधावर

samarjit singh ghatge

कोल्हापूर : अपूरी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी नुकसान भरपाई, लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिल, दूध दरवाढ, आदी मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. शेतकरी अडचणीत असूनही राज्य शासन मदतीचा हात देत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न थेट बांधावर जावून जाणून घेत ते शासनापर्यंत पोहचविणार आहे. त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोषाला शासन जबादार असेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

घाटगे म्हणाले, कोरोनासह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे.अतिवृष्टीमुळे भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजनेतून अनेक शेतकरी वंचित आहेत. कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा. प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळावे. कोरोना काळातील वीजबिल माफ करावे. दूध दरवाढ मिळावी आदीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल.

राज्य शासन प्रत्येकवेळी केंद्र सरकाराकडे बोट दाखवत आहे. असे करुन आपल्या जबादारीतून राज्य शासन मुक्त होवू पहात आहे. राज्य शासनाला फक्त क्षेय पाहिजे. इतर सर्व बाबी केंद्राने कराव्यात असे वाटते. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवणे राज्याने बंद करावे, असा सल्ला समरजित घाटगे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER