मोदींच्या पुतणीला भाजपाने तिकीट नाकारले

- सर्वांसाठी नियम सारखा, नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचे नाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुतणी सोनल मोदी (Sonal Modi) यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचे तिकीट नाकारले आहे. याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (C. R. Patil)म्हणालेत, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचे नाही असा पक्षाचा निर्णय झाला आहे. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारले.

नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितले होते. काल भाजपाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यात सोनल मोदी यांचे नाही. याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारले असता, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. आणि नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा पक्षाचा निर्णय झाला आहे, असे ते म्हणाले.

तिकीट नाकारल्यानंतर सोनल मोदी यांनी प्रतिक्रिया दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितले होते, असे म्हणाल्यात. सोनल मोदी या मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहेत. प्रल्हाद मोदी यांचे किराणा दुकान आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. सोनल मोदी कार्यकर्ता म्हणून भाजपाचे काम करतात.

गुजरातमध्ये ६ महापालिकांची निवडणूक घोषित झाली आहे. यात अहमदाबाद, सुरत, बडोदा, भावनगर, जामनगर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे. २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ८१ नगरपालिका, ३१ झेडपी आणि २३१ पंचायत समितींसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER