हिंदूंबाबत आक्षेपाहार्य विधान करणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

Sharjeel Osmani & BJP

पुणे : आजचा हिंदू समाज हा सडका असल्याचे वक्तव्य काल पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील उस्मानी (Sharjeel Osmani) यांने केले आहे. या संदर्भात हिंदू संघटनांसह भारतीय जनता पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात भाजपनं (BJP) तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली. आपल्या भाषणात शरजिल याने धार्मिक तेढ निर्माण करणारे व्यक्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शलजिलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे

‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मागवले आहेत. त्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर शर्जील उस्मानी वर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER