धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ; भाजप महिला आघाडीची मागणी उद्धव ठाकरेंना मागणी

Uma Khapre - Uddhav Thackeray - Dhananjay Munde

मुंबई :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, या प्रकरणावरून भाजपा (BJP) आक्रमक होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे (Uma Khapre) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्राच्या माध्यमातून केली.

भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र :
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडे यांच्यावर तरुणीने केले यौन शोषणाचे आरोप …. वाचा मुंडे काय म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER