बेपत्ता प्रताप सरनाईकांना शोधा; भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलिसांना दिली तक्रार

Pratap Saranaik

ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घ्या, अशी मागणी भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली. याबाबत तक्रार नोंदवली.

हकीगत अशी की, तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा (ED Inquiry) ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता काय झाले, कोणी किडनॅप केले, याची भीती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधा, असे म्हणत काल (२६ मे) रोजी भाजपा नेते किरीट सोमय्या, ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली.

कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टाईन, फलक झळकले

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील मतदारांनी “कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन,” असे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले.

ईडीच्या धाडी

ईडीने नोव्हेंबर २०२० मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीने चौकशी केली. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटकही केली होती. १८ मे रोजी ईडीने सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर धाड टाकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button