भाजप प्रदेश कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्याला डावलले

रत्नागिरी/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. खरेतर प्रदेश चिटणीस असणारे डॉ. विनय नातूंकडे उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने त्यांच्याऐवजी माजी आमदार बाळासाहेब माने यांना यावेळी प्रदेशवर संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांनाही कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. प्रदेश कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER