भिवंडीत भाजपाला दणका; प्रदेश सचिव चोरघे यांचा राजीनामा

Dayanand Choraghe

भिवंडी : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भाजपामधील गटबाजीमुळे प्रदेश सचिव दयानंद चोरघे (Dayanand Choraghe) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.

भाजपाचा (BJP) विस्तार करण्यासाठी दयानंद चोरघे यांनी ठाणे जिल्ह्यात प्रत्येक गावात भाजपाच्या शाखा उघडल्या आहेत. खासदार, आमदार निवडून आणण्यासात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाचे अनेक कार्यकर्तेही नाराज झाले आहेत.

दयानंद चोरघे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागल आहे. कारण त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ होईल.

काँग्रेसमधून आले होते

दयानंद चोरघे काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात आले होते. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. चोरघे यांची चार महिन्यापूर्वी प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला सारून काम सुरू केल्याने दयानंद चोरघे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना होती.

या गटबाजीमुळे दयानंद चोरघे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. चोरघे यांनी राजीनामा वैयक्तिक कारणास्तव देत असल्याचे नमूद केले तरी खासदार कपिल पाटील यांच्यासोबत झालेल्या मतभेदातूनच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER