‘मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा’

Sharad Pawar

मुंबई :- रम्या या काल्पनिक पात्राद्वारे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साताऱ्यात भर पावसात शरद पवारांनी भाषण केले त्याचं कौतुक होत असताना रम्या कवितेच्या ‘पावसाने’ साहेबांना भिजवणार आहे. असं सांगत ‘बारामतीचा कणा’ नावाची कविता जाहीर केली आहे.

ही बातमी पण वाचा:- … तर मला मुख्यमंत्री का करण्यात आले?, राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

भाजपाच्या रम्यानं, कवी कुसमाग्रजांची कविता पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा या कवितेचा संदर्भ घेत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ते असे की, शरद पवार हे इतिहास आठवताना स्व. वसंतदादा पाटील यांच्याकडे जाऊन आपलं मनमोकळं करतात. मात्र दुखा:च्या भरात ‘कणा’ या कवितेतील शब्द आता बदलले असं सांगत रम्यानं शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

बारामतीचा कणा
ओळखलं का सर मला, राज्यात आलं कुणी पक्ष होता कर्दमलेला, तुम्हालाच पाजलं होतं पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला दिल्लीकडे पाहून
सोनिया बाई पाहुणी आली गेली सत्तेत राहून
इटलीवासिणीच्या इशाऱ्यावर १० वर्षे नाचलो
कमळापाशी जाऊ कसा? म्हणून महाराष्ट्रातच साचलो
२०१४ पासून मात्र पक्ष खचला, सत्तेची चूल विझली फडणवीसांनी होते नव्हते ते नेले,
प्रसाद म्हणून पक्षासाठी ४ नेते ठेवले
पुतण्या, लेकीला घेऊन संगती, सर बारामती लढतो आहे
केलेले पाप धुतो आहे, चिखल गाळ काढतो आहे.
सत्तेकडे हात जाताच रडत रडत उठला
पाठिंबा नको सर, राजकारणात जरा एकटेपणा वाटला
मोडून पडलं स्वप्न माझं, आणि मोडला आहे कणा
एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा…