‘ज्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो व नाइट लाइफमुळे फुलतो’; भाजपचा सेनेवर पलटवार

Atul-Bhatkhalkar-uddhav-thackeray

मुंबई : लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद असलेली मंदिरं खुली करण्याची मागणी करत भाजपनं (BJP) राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मंदिरं उघडी (temple-opening) करण्याबद्दल विरोधी पक्ष भाजपने भूमिका मांडली होती. यावरून आज शिवसेनेनं सामनाच्या माध्यमातून जहरी टीका करण्यात आली. याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा:- विरोधकांचे आंदोलन धार्मिक की, राजकीय? शिवसेनेनं उपस्थित केला सवाल

‘ज्या पक्षातील नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमुळे फुलतो त्यांची वृत्तपत्रं मंदिरं उघडण्याच्या बाजूने बोलूच शकत नाही’, असे जोरदार प्रत्युत्त भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर जहरी टीका करण्यात आली. ‘भाजपचं घंटानाद आंदोलन हे धार्मिक होतं की राजकीय?’ असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला. त्यावर भातखळकर (Bhatkhalkar) यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

‘दारुची दुकानं उघडल्यानंतर ज्याप्रमाणे पैश्यांची आवक सुरू आहे तशी आवक मंदिरांमधून झाली असती तर यांनी मंदिराचे दरवाजे केव्हाचेच उघडले असते’ अशीही घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे. इतकंच नाही तर ‘देव पळाला अशी भाषा वापरणारे असेच अग्रलेख लिहिणार. मात्र आता लोकभावनेचा आदर करण्यासाठी यांना मंदिरं उघडी करावीच लागणार, असा दावाही भातखळकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER