अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत चालले आहे . अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कोरोनाचा लढा संपलेला नाही. अशा वेळी कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER