शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिले बिस्कीट; भाजपने लगावला टोला

Shivsena-BJP

मुंबई :  बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट हे चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली आहे. यावरून शिवसेनेवर (Shivsena)भाजपने (BJP) निशाणा  (BJP Criticize shivsena)साधला .

शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत एक टोमणा मारला आहे. अगदी योग्य निवडणूक चिन्ह दिले बिहार निवडणुकीसाठी….’पीडी’ और ‘बिस्कीट’ की खूप जमेगी जोडी… असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान दरम्यान, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर वा बॅट यापैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली होती. बिहार निवडणुकीत ही तिन्ही चिन्हे खुली आहेत. मात्र, आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले. मात्र, हे चिन्ह बदलून देण्याची लेखी मागणी बिहारमधील शिवसेनेकडून आयोगास करण्यात आली असून आता आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्वाना आहे .

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER