ठाण्यात पुरग्रस्तांची चेष्टा, भाजप नगरसेवकाचा स्थायी समितीच्या बैठकीत आरोप

thane news

ठाणे – मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील नागरीकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी महत्वाच्या साहित्याचे कीट देऊ केले होते. परंतु हे साहित्य पुरग्रस्तांर्पयत पोहचलेस नसल्याचा धक्कादायक बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. त्यातही 2005 मध्ये सुध्दा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु त्यावेळेचे साहित्य दादोजी कोंडदेव स्टेडीअममध्ये धुळखात पडून असून, अर्धे भंगारात विकल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला.

राज्यातील काही भागांबरोबर ठाण्यातील दिवा, कोपरी, मुंब्रा, कळवा आदींसह शहरातील इतर भागातही पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीची मदत म्हणून धान्य आणि इतर साहित्याचे कीट तयार करुन सव्र्हे करुन ते पुरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय सव्र्हे करण्यात आला होता. कोपरीतही असा सव्र्हे करण्यात आला होता. त्यानंतर या भागात 1500 च्या आसपास पुरग्रस्त आढळून आले. मात्र त्यानंतर पालिकेच्या अधिका:यांनी 500 कुपन आणून 100-100 या प्रमाणो नगरसेवकांची हाती दिले. त्यातही या भागातील काही नगरसेवक नवीन असल्याने त्या कुपनच्या मागेच त्यांनी आपले शिक्के मारले आणि ती मदत पुरग्रस्तांर्पयत पोहचली. मात्र प्रत्यक्षात 1500 जणांना मदत मिळणो अपेक्षित असतांना काही जणांनाच मदत मिळाल्याने उर्वरीत पुरग्रस्त नाराज झाले असून त्याची उत्तरे आता नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यामुळे ही पुरग्रस्तांची चेष्टा असून यामध्ये पालिकेचे अधिकारीच दोषी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जे खरे पुरग्रस्त होते, त्यांच्यार्पयत ही मदत पोहचलीस नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

दुसरीकडे 2005 मध्ये आलेल्या पुरामध्येही अनेकांचे नुकसान झाले होते. मात्र त्यावेळेसचेही साहित्य आजही दादोजी कोंडदेव क्रिडागृहात धुळखात पडले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. काही साहित्य भंगारात विकले जात आहे, तर काही साहित्य आता इतर ठिकाणी वाटले जात असल्याची शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली. दरम्यान अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी पालिकेच्या अधिका:यांनी रात्री दोन वाजेर्पयत ही कामे केली असून त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित करणो चुकीचे असल्याचे सांगितले. तर प्रभारी सभापती नरेश म्हस्के यांनी पालिकेने आपल्या परिने मदत केली असल्याचे सांगून हा विषय आता थांबविण्याचा सल्ला दिला.