राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग ; शरद पवारांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ

Sharad Pawar

मुंबई : नवी मुंबईत राष्ट्रवादीने भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या गडाला खिंडार पाडले आहे . भाजपच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे .

दरम्यान नवी मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याआधी 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER