हल्ल्यात जखमी भाजप नगरसेविकेच्या पतीचा मृत्यू

विनायक सुरेंद्र हुक्किरे

कोल्हापूर : आर्थिक वादातून झालेल्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विनायक सुरेंद्र हुक्किरे (वय 38, रा. नॅशनल हायस्कूलसमोर, जवाहरनगर) यांचा सोमवारी पहाटे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. इचलकरंजी नगरपालिकेच्या भाजप (BJP) नेहा हुक्किरे यांचे ते पती होत. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या बसवराज महादेव तेली ऊर्फ कानापान्नावर (रा. जवाहरनगर), अशोक तमन्ना तेली व सुभाष तमन्ना तेली (दोघे रा. शहापूर) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जवाहरनगर परिसरातील नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांचा सूर्या नामक जिम व हॉटेलचा व्यवसाय होता. शनिवारी (दि. 7 ) रात्री कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराजमध्ये ते मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तिघा संशयितांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हुक्किरे यांचा मित्र जियाउद्दीन फकीर याचा भाऊ सद्दाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली याने विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली (दोघे रा. शहापूर) या दोघा साथीदारांच्या मदतीने चाकूने हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER