संभाजीनगर नामकरणाचा ठराव संमत करण्यासाठी भाजपा नगरसेवकांचा काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश

bjp-corporator-demand-aurangabad-name-change-to-sambhaji-nagar

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या आशयाचा ठराव महानगर पालिकेत ठेवण्यात यावा या मागणीसाठी भाजपाच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून सभागृहात येत निषेध केला. मागीलवेळीसुद्धा भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले होते.

आज सकाळी औरंगाबाद महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा सुरु झाली तेव्हा औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी पाचवे स्मरणपत्र महापौरांना देण्यात आले. हा ठराव मंजूर होत नसल्याने भाजपा नगरसेवकानी काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश केला.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे हा ठराव पारित करण्यात यावा याकरीता रितसर ठराव मागील चार महिन्यांपासून दिला. मात्र हा ठराव सोडून इतर सर्व ठराव पारित करण्यात येतात. हा ठराव पारित करून तो राज्य सरकारला पाठवावा अशी आमची मागणी असल्याचे भाजप नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.