बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेनेचा भाजपला धक्का, भाजपचा नगरसेवक सेनेत

Shivsena & BJP

नवी मुंबई : शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच शिवसेनेनं भाजपला मोठा झटका दिला. नवी मुंबईतील यादवनगर विभागावरआपले वर्चस्व गाजवणारे भाजपचे नगरसेवक राम आशिष यादव यांनी आमदार गणेश नाईकयांच्याशी फारकत घेत शिवसेनेत प्रवेश केला. नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचा गड दिवसेंदिवस ढासळत चालल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

यादव नगर एमआयडीसी परिसरात राम आशिष यादव मागील 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहेत. त्यांनी मागील 10 वर्षे महापालिकेत या भागाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मागील वर्षी गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यावर यादव यांनीही नाईकांना समर्थन देत भाजपात प्रवेश केला होता. सध्या नवी मुंबईमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतरण होत आहे. यामध्ये भाजपलासर्वात जास्त फटका बसताना दिसून येत आहे. पक्षाचे कट्टर समर्थक साथ सोडू लागल्याने नवी मुंबईतील भाजपला जोरदार झटका बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER