भाजपला दानशूरांची मदत, निवडणुकांसाठी मिळाल्या २७१ कोटींच्या देणग्या

Modi Shah

नवी दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वातील एनडीएच्या सरकारने नुकतेच ७ वर्षे पूर्ण केले आहे. सलग दुसऱ्या टर्ममध्ये मोदींच्या नेतृत्वात बहुमताने सरकार स्थापन झाले असून, भाजपला (BJP) त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. भाजपला दानशूरांकडून भरभरुन मदत मिळत आहे. कुठल्याही निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या भाजपला इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून २०१९-२०मध्ये तब्बल २७१ कोटींच्या देणग्या मिळाल्याची बाब स्पष्ट (BJP collect Rs 271 crore for elections)झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इलेक्टोरल ट्रस्टकडून निवडणुकीदरम्यान विविध पक्षांना पुरवलेल्या निधीपैकी ८० टक्के निधी हा एकट्या भाजपला देण्यात आला आहे. यातील सर्वाधिक देणग्या या एअरटेल आणि डीएलएफने दिल्या असून यामध्ये ‘प्रूडेंट’कडून २७१.७५ कोटी, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४५.९५ कोटी, एबी जनरल ट्रस्टकडून ९ कोटी आणि समाज इलेक्टोरल ट्रस्टकडून देण्यात आलेल्या ३.७५ कोटी रुपयांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी सर्वाधिक निधी मिळणारा भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीवरुन ही बाब उजेडात आली असून भाजपच्या तुलनेत काँग्रेस खूपच मागे आहे. काँग्रेसला देणग्यांच्या माध्यमातून केवळ ५८ कोटी मिळाले आहेत.

निवडणूक आयोगाने २०१९-२० चा वार्षिक ऑडिट रिपोर्टही जाहीर केला आहे. यामध्ये पक्षांच्या उत्पन्नांची माहिती देण्यात आली आहे. यात टीआरएस पक्षाने सर्वाधिक १३०.४६ कोटींचा निधी मिळवला आहे. वायएसआरसीपीने ९२.७ कोटी रुपयांची तर बिजदने ९०.३५ कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे. अण्णा द्रमुक ८९.६ कोटी, द्रमुक ६४.९० कोटी आणि आम आदमी पक्षाला ४९.६५ कोटी रुपये मिळाले आहेत. या उत्पन्नात इलेक्टोरल ट्रस्टसह अन्य मार्गाने आलेल्या उत्पन्नाचीही नोंद करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षात काँग्रेसचे उत्पन्न ६८२ कोटी इतके होते जे मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटले आहे. स्थानिक पक्षांनी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातूनही उत्पन्न प्राप्त केले आहे. भाजप ५०.५ कोटी, डीएमके ४५.५ कोटी, आप १७.६ कोटी, समाजवादी पार्टी १०.८४ कोटी, जेडीएस ७.५ कोटी, अण्णा द्रमुक ६.०५ कोटी आणि राजदला २.५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button