मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला : चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

chandrakant patil

मुंबई : भाजपची मेगाभरती ही चूक असल्याचे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे . या विधानावरून पाटील यांच्यावर महाविकास आघाडीकडून निशाणा साधण्यात येत आहे .त्यामुळे पाटील यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे .

मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेलाभाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करतो. मेगा भरतीचा निर्णय हा कोणा एकटयाचा नाही तो, कोअर कमिटीचा निर्णय होता असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपामध्ये जुन्या लोकांना डावललं नाही असा त्यांनी दावा केला. बाहेरुन आलेल्या फक्त २७ जणांना तिकिट दिली असे त्यांनी सांगितले.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अन्य पक्षांतील बडय़ा नेत्यांना गळाला लावून संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न भाजपने केला असला तरी या ‘भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला’, असे सांगत भरतीच्या प्रयोगामुळे पक्षाचे नुकसानच झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

चंद्रकांत पाटील ‘त्यांना’ काढून चूक सुधारा – नवाब मलिकांचा टोला