हा तर भक्तांच्या श्रद्धेचा विजय – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई : जवळपास सात ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी करोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देवस्थाने बंद असल्याने त्यांच्या परिसरात भाविकांची सेवा करणाऱ्या व्यावसायिकांची रोजीरोटी बंद झाली होती. करोनाचे सर्व निर्बंध पाळण्याची तयारी भाविकांनी दाखवली तरीही हे सरकार कठोरपणे परवानगी नाकारत होते, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतर आता मंगल पर्वातच पुन्हा एकदा देवाच्या दारी जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी मंदिरात येताना भाविकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टनसिंग पालन करणं, आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक असून, कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER