उद्धव ठाकरेंनी पाच मिनिटं मराठा आरक्षणावर बोलून दाखवावे; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयावर सलग पाच मिनिटं बोलून दाखवावं, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असेही यावेळी पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले. मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नसेल तर तो विषय समजून घेण्याची तयारी पाहिजे, असा सल्लाही यावेळी पाटलांनी दिला.

तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवरही (Congress) टीका केली. मराठा संदर्भात संबंधित मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) किंवा वरिष्ठ अधिका-यांनी दिल्लीत ठाण मांडून बसायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षांची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान पाटील यांनी कंगनाबद्दलही भाष्य केले . कंगनाप्रकरणी (Kangana Ranaut) उद्धव ठाकरे गंभीर नाहीत. त्या विषयाची जबाबदारी संजय राऊतांवर दिली आहे. यश मिळाले तर आपले आणि अपयश मिळाले तर ते संजय राऊतांचे अशी यांची भूमिका आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER