बसवरचा भगवा काढल्याने चंद्रकांत पाटील संतापले ; ठाकरे आणि शरद पवारांवर साधला निशाणा

Chandrakant Patil & Uddhav Thackeray & Sharad Pawar

मुंबई :- हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांकडून सोमवारी रोखण्यात आले. यावेळी एका बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झालेल्यांनी… : भाजपा नेत्याची शिवसेनेवर टीका 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी टीका पाटील यांनी केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER