मराठा आरक्षण : शरद पवारांची दोन्ही राजे आणि भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी

Sharad pawar-Maratha Reservation

पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे .यापार्श्वभूमीवर खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) व छत्रपती उदयनराजे (Chhatrapati Udayan Raje) या दोघांना भाजपने राज्य सभेत पटवले आहे . त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) हा प्रश्न भाजप आणि दोन्ही राजांच्या गळी मारण्याचा प्रयत्न केला. पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप प्रणित एनडीएसोबत येवून सरकार बनवावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्या वरही शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली . रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही, असा टोलाही पवारांनी आठवलेंना लगावला आहे .

देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळविण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावर सुशांतसिंग प्रकरणावर सीबीआयने आतापर्यंत काय दिवे लावले ? असा सवालही पवारांनी उपस्थित केला .

तसेच पवारांनी कृषी विधेयकावरही भाष्य केले . कृषी विधेयक येण्यापूवीर्ही शेतक-यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे, मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER