हे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार

Sharad Pawar

पंढरपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत . या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच  प्रतिक्रिया दिली . शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर ते  पत्रकारांशी बोलत होते. खासदार संजय राऊत हे संपादक आहेत.

त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray. ) व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे, असे  वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावर पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER