भाजपने कंबर कसली; शिवसेनेत गेलेल्या ‘या’ आमदाराला परत आणण्याचे प्रयत्न

Shivsena-BJP

नाशिक :- नाशिक महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप कंबर कसताना दिसत आहे. शिवसेनेचा झेंडा हाती धरलेले माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना पक्षात परत बोलवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गळ टाकला आहे. मात्र, भाजपच्या गळाला बाळासाहेब सानप पुन्हा लागतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), जयसिंगराव गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आता बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये येणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर होते. २०१४ मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता.

माजी आमदार बाळासाहेब सानप हे २०१४ मध्ये नाशिक-पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी भाजपनं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे एकटा पडलेला पक्ष भाजपनेदेखील महाविकास आघाडीविरुद्ध (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे.

ही बातमी पण वाचा : विष्णू सावरा यांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER