भाजपाने औरंगाबादेत जाळला वारिस पठाण यांचा पुतळा

BJP burns effigy of Waris Pathan

औरंगाबाद : ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आज शुक्रवारी औरंगाबाद येथे भाजपातर्फे दहन करण्यात आले. वारिस पठाण यांनी मुस्लिम समाजाला चिथावणी देणारे वक्तव्य कर्नाटकमधील गुलबर्गा येथे केले होते.

आम्ही केवळ १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी ठरू, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले होते. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर भाजपासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

आज आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात पुतळा जाळण्याचे आंदोलन करण्यात आले. पठाण यांना तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, पठाण यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

… संविधानाच्या मर्यादेतच बोललो, माफी मागणार नाही – वारीस पठाण