कामठीत भाजप आणि बरिएमची युती

bawankule

नागपूर : नागपूर जिल्हातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या कामठी नागरपरिषदेसाठी होणारी निवडणूक भाजप आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच सोबत मिळून लढणार आहे. कामठी शहरात बरिएमची जोरदार पकड असली तरीही निवडणुकीत बीरिएमचे उमेदवार के भाजपच्या पक्ष्याच्या कमळ या चिन्हावर आपले भाग्य अजमावणार आहेत.

याबाबतची अधिकृत घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बरिएमच्या संस्थापक अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी संयुक्तपणे पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, कामठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी ही युती करण्यात आली आहे. कामठी नगरपरिषदेत एकूण १६ प्रभागांमध्ये ३२ जागा असून यापैकी २० जागी भाजप आणि १२ जागांवर बरिएमचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहतील. परंतु ठरलेल्या जागावाटपात काही बदल होण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वेळ पडल्यास कामठी प्रमाणे जिल्ह्यातील इतर नागरपरिषदांच्या निवडणुकीमध्येही आश्याचप्रकारची युती होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

या घोषणे बरोबरचं कामठी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी बरिएमचे विद्यमान नगरसेवक अजय कदम यांची निवड करण्यात आल्याची माहितीही सुलेखा कुंभारे यांनी दिली.