भाजपकडून डाव्यांच्या गडाला सुरुंग; थिरुवनंतपुरम येथे महापौरपदाचा उमेदवार पाडला

BJP

थिरुवनंतपुरम :- बिहार विधानसभा आणि हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत अनेकांना मोठा धक्का दिला. त्यानंतर आता डाव्यांच्या भक्कम गडामधील अनेक वर्षांपासूनची कोंडी फोडण्यात भाजपला (BJP) मोठे यश आले आहे. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन महापालिकांत भाजपची  सत्ता येण्याची शक्यता बळावली आहे.

केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपने गेल्या वेळच्या तुलनेत जोरदार मुसंडी घेतली असून चांगले प्रदर्शन केले आहे. त्रिवेंद्रम आणि थिरुवनंतपुरममध्ये भाजपने एलडीएफ आणि यूडीएफच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

केरळमध्ये ९४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होती. यापैकी एलडीएफ ५०३ वर पुढे आहे. तर यूडीएफ ३७७ आणि भाजपा २४ ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. भाजपकडून आमदारकीची निवडणूक लढलेल्या राजेश यांना या निवडणुकीत उतरवून भगवा दलाने मोठा डाव खेळला होता. राजेश नेडुमंगड मतदारसंघातून विधानसभा लढले होते. तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर होते.

थिरुवनंतपुरम आणि कोझिकोड कार्पोरेशनमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये भाजपने थिरुवनंतपुरममध्ये दोन्ही विरोधी पक्षांना हैराण करून सोडले होते. १०० जागांपैकी भाजपला ३४  मिळाल्या होत्या. यूडीएफ तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. या वेळीही भाजपने कडवी टक्कर दिली आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने डाव्यांच्या  महापौरपदाच्या उमेदवार एस. पुष्पलता यांनाच पराभवाची धूळ चारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER