फक्त तोंडाची वाफ, काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभला या महाराष्ट्राला’; भाजपचा टोला

BJP Atul Bhatkhalkar slams cm uddhav thackeray

मुंबई : मराठा समाजाला (Maratha community) शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती . त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द करण्याचा निर्णय सुनावल्यामुळे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधकांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही लढाई पुढे कशी नेली जाणार, यावरही मुख्यमंत्री बोलले. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. ‘यांना काहीच झेपत नाही, जमत नाही, कळत नाही, फक्त फुकाची बडबड, तोंडाची वाफ. काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला…,’ असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये ‘प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून,’ असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button