ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली आहे : भाजप नेत्याची टीका

मुंबई : बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या (pooja-sawant-suicide-case) प्रकरणात भाजपाने (BJP) थेट शिवसेनेचे (Shivsena) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचं नाव घेतल्याने राठोड यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे राजकीय संकट निर्माण झाले आहे. त्यातच आता भाजप आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप केला आहे.

अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER