शिवसेना मंत्र्यांचे मुंबईमधील कार्यालय अनधिकृत ; भाजप नेत्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली .जो न्याय कंगनाला दिला तसाच इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून द्यावा, असे भाजपाने म्हटले होते .

आज भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्विट करून शिवसेना मंत्री अनिल परब यांचे कार्यालयच बेकायदेशीरपणे बांधल्याचे उघड केले आहे. याबाबत त्यांनी म्हाडाने २०१९ मध्ये त्यांना बजावलेली नोटीस पोस्ट केली आहे. एक वर्षापूर्वी नोटीस बजावूनही अद्याप अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER