आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का ? भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल

Atul Bhatkhalkar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केला गेला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का दिला गेला, या दिल्ली सरकारच्या प्रश्नावर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court)केंद्र सरकारला जाब विचारला. यापार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्राला (Maharashtra) मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारला गेलेला जाब म्हणजे केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत असलेल्या महाविकास आघाडीला सणसणीत थप्पड आहे…आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी ट्विटमधून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button