‘भाजपासोबत असताना ज्वलंत हिंदुत्व, आता काँग्रेससोबत ज्वलंत इटालियन गांधीत्व’

मुंबई : मागील १० दिवसांत हिंदुस्थानात ३६ हजार ११० कोरोनाबळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझीलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता हिंदुस्थानची भीती वाटू लागली आहे. हिंदुस्थानात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. हिंदुस्थानात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका हिंदुस्थानला बसत आहे. तरीही ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच, आज भारत देश जिवंत आहे, असा दावा शिवसेनेने शनिवारच्या सामनातील संपादकीयमधून केला होता.

त्यानंतर भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shivsena) सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हिंदुस्थान गांधी-नेहरू खानदानाची जागीर नाही, असे दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आता मात्र त्यांचे पुत्र आणि आताचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गांधी- नेहरू यांच्यामुळे भारत देश जिवंत असल्याचे म्हणत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ब्रिटन भेटीत म्हणाले होते की, ब्रिटिशांचे आमच्यावर उपकार आहेत. त्याची आठवण झाली. कणा नसलेली माणसं कायम अशीच का बोलतात, अशी मिस्कील टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

भाजपासोबत असताना ज्वलंत हिंदुत्व होतं. आता काँग्रेससोबत गेल्यावर ज्वलंत इटालियन गांधीत्व दिसत आहे. राम-कृष्णाचा, चंद्रगुप्त-अशोकाचा, छत्रपती शिवरायांचा, सुभाषबाबू-सावरकरांचा हा महान देश कुणा एका परिवारामुळे आहे, असे म्हणणे म्हणजे चाटुकारिता आणि गुलामगिरीचा कळस आहे. जनाबसेनेसाठी एक माहिती देतो. १९६३ साली दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत स्वा. सावरकरांना प्रश्न विचारला, ‘नेहरूंनंतर कोण?’ १९६२च्या युद्धात तोंडावर आपटलेले नेहरू आजारी असल्यामुळे देशभरात ही चर्चा होती. सावरकर म्हणाले, नेहरूंनंतर कोण हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण, या प्रश्नासारखा मला वाटतो, असा टोलाही भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button