
मुंबई : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकरी संघटनांकडून उद्या देशव्यापी बंदची हाकही देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे.
मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचे आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. APMC च्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनीही (Sharad Pawar) २०१० मध्ये पत्र लिहिले होते . आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळचा विसर पडला आहे असेही रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी म्हटले आहे.
शरद पवार हे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यांवरुन त्यांनी देशाच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते . बाजार समित्यांच्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे असे त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. शेतकऱ्यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असेही या पत्रात त्यांनी म्हटल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
ही बातमी पण वाचा : ‘कृषीमंत्री असताना पवारांनी एपीएमसी कायद्याचे फायदे सांगितले होते’, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला