रत्नागिरी; वाढत्या विजबिलांसाठी भाजपची महावितरणवर धडक

BJP attack on MSEDCL

रत्नागिरी/प्रतिनिधी: लॉकडाऊनकाळात आलेल्या भरमसाठ विजबिलांमुळे सामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारी धसास लावण्यासाठी मंगळवारी भाजपचे शिष्टमंडळ वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटले व त्यांनी जनतेच्या तक्रारी मांडल्या. यावेळी महावितरणतर्फे ग्राहकांना दिलासा देणारी आश्वासने देण्यात आली.

यावेळी रत्नागिरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वीज मंडळाचे अधिकारी श्री.बेले , श्री.चव्हाण व श्री. पळसुलेदेसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी श्री. बेले यांनी व्यापारी बिले दुरुस्त करून नव्याने देण्यात येतील. आता आलेली व्यापारी बिले भरणे आवश्यक नाही. व्यक्तिगत ग्राहकांची बिलाबद्दल शंका असेल तर त्याचे निरसन केले जाईल. व्यक्तिगत बिल भरण्यासाठी ३ हप्त्यांची मुदत दिली जाईल तसेच सद्यस्थितीत कोणाचही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. यावेळी जनतेवर पडलेला अतिरिक्त बोजा कमी करता आला तरच गोंधळाचे व साशंकतेचे वातावरण शांत होईल अशी प्रतिक्रिया भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे ऍड.दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, अण्णा करमरकर, राजेश तोडणकर, राजेश सावंत, नगरसेविका सौ.रसाळ, सौ.करमरकर, सौ.जठार, श्री. उमेश कुलकर्णी यांचेसह कार्यकर्ते वीज मंडळ अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER